वृक्षांची अवैध कत्तल करणारे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 03:37 PM2018-11-18T15:37:40+5:302018-11-18T15:38:20+5:30
वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मालेगाव तालुक्यातील पांग्राबंदी येथील जंगलात वृक्षांची कत्तल करणाºया दोघांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेत त्यांच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. यातील एक आरोपी फरार असून, वनविभागाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
मालेगाव वन परिक्षेत्रांतर्गत पांग्रा सर्कलमध्ये वनपाल व त्यांची चमू नियमित गस्त घालत असताना पांग्रा बिट क्रमांक १ मध्ये लाकडे तोडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला. यावरून सदर भागात पाहणी केली असता जितेश प्रभाकर सिरसाट, उज्वल अजाबराव शेगावकर आणि अतुल भगवान उमाळे हे तिघे झाडे कापत असल्याचे आढळून आले. यावेळी वनपाल व त्यांच्या चमूने आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता अतुल उमाळे हा फरार झाला, तर जितेश सिरसाट आणि उज्वल शेगावकर यांना वनविभागाच्या कर्मचाºयांनी ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या पाहणीदरम्यान आरोपींनी २६ हजार ७६६ रुपये किमतीची १,२९३ घनमीटरची झाडे तोडल्याचे ११ थुट्यांवरून आढळून आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींवर वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) व महाराष्ट्र वन नियमावल २०१४ च्या कलम ४१ नुसाकर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक नितिन गोंडाणे, वनक्षेत्रपाल सिद्धार्थ वाघमारे यांच्या मार्गदर्शनात वनपाल व्ही. जी राऊत चौकशी करीत आहेत. ही कारवाई वनरक्षक व्ही. जे. काळुशे, आर. बी. चिंतलवाड, जी. बी. बोबडे, के.व्ही. देवकर, ए. यू. राठोड, विशाल तायडे, तसेच वाहनचालक गजानन शेंडे व विनायक नागरे यांच्यासह वन कामगारांच्या सहकार्याने करण्यात आली.