प्रकल्पातून अवैध पाणी उपसा; पाणीटंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 05:28 PM2019-04-05T17:28:56+5:302019-04-05T17:29:13+5:30
प्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत असून, पिण्यासाठी राखीव असलेल्या प्रकल्पांतूनही पाण्याचा भरमसाठ उपसा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील चिखली येथील प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा सुरू असल्याने पाणीटंचाईचे सावट आहे.
जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्यानंतर प्रकल्प तुडूंब भरले होते; परंतु या प्रकल्पांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत असून, पिण्यासाठी राखीव असलेल्या प्रकल्पांतूनही पाण्याचा भरमसाठ उपसा सुरू आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रकल्पांतील जलसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पातील पाणी सिंचन किंवा अन्य कारणांसाठी वापरावर निर्बंध आणले आहेत. राखीव प्रकल्पातून पाणी पिण्याऐवजी अन्य कारणांसाठी पाण्याचा उपसा होत असेल तर संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही पाटबंधारे विभागाने दिलेल्या आहेत. तथापि, मानोरा तालुक्यातील अनेक प्रकल्पांमधून पाण्याचा अवैध उपसा होत असल्याने पाणीटंचाईचे संकेत आहेत. चिखली येथील तलावात अवैधपणे पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटार बसविल्या आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, अवैध पाणी उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी गावकºयांनी शुक्रवारी केली.