गारपिटीने पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:30+5:302021-03-27T04:42:30+5:30
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, ...
यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी अधिकारी चंद्रभान मकासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात कांदा, कडधान्य, फळे व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी यामधून सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा. जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी यावेळी जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, तसेच पंचनाम्याची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. तसेच लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येईल, असे सांगितले.