वाशिम जिल्ह्यात ५९ अंगणवाडी बांधकामाचे लवकरच कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:15 PM2019-08-26T15:15:40+5:302019-08-26T15:15:45+5:30

५९ अंगणवाडी केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी प्रशासकीय मंजूरी यापूर्वीच दिलेली आहे.

Immediate order for construction of 59 Anganwadi in Washim district | वाशिम जिल्ह्यात ५९ अंगणवाडी बांधकामाचे लवकरच कार्यारंभ आदेश

वाशिम जिल्ह्यात ५९ अंगणवाडी बांधकामाचे लवकरच कार्यारंभ आदेश

googlenewsNext

बालकांची गैरसोय दूर होणार : निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली दिल्यानंतर इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच, कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. 
बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. वाशिम जिल्ह्यात एकूण १०७६ अंगणवाड्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार आणखी काही नवीन अंगणवाडी केंद्रांचा मुद्दा समोर आला होता. सन २०१८-१९ या वर्षात २० आणि सन २०१९-२० या वर्षात ३९ अशा एकूण ५९ अंगणवाडी केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी प्रशासकीय मंजूरी यापूर्वीच दिलेली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या रकमेच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरीदेखील प्रदान करण्यात आली आहे. त्यानंतर इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रक्रिया पूर्ण होताच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.
सन २०१८-१९ या वर्षात मारसूळ, खंडाळा शिंदे, करंजी क्र. २, अंचळ, पार्डी तिखे, घोटा, चिंचाबा भर क्र.१, मूर्तिजापूर, पेडगाव क्र. ४, माळशेलु क्र.२, लखमापूर, म्हसणी क्र. २, दापुरा बु. क्र.२, गोस्ता क्र.२, खेर्डा खु. मिनी, तोरनाळा क्र.२, जांभरून भी., काटा क्र.३, वाघोली खु., कन्हेरी अशी एकूण २० अंगणवाडी केंद्र साकारली जाणार आहेत. प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी ८.५० लाख रुपये निधी प्रस्तावित आहे.
तसेच सन २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या २.२५ कोटी तरतुदीच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरी मिळालेली आहे. यामध्ये पिंपळा, सोनाळा क्र.१, आमखेडा मिनी, मोप क्र.२, शेलु खडसे, मोहजा बंदी, भर जहॉगीर क्र.४, लोणी बु. क्र.१, कोयाळी बु., पिंपरखेडा, वाडी वाकद, कंकरवाडी क्र.२, येवती क्र.१, जवळा, कुºहा, वाकद क्र ६, वडजी, शेलगाव राजगुरे, नावली क्र १, येवती क्र २, कुकसा, कळमगव्हाण, नंधाना क्र १, वरूड तोफा, किनखेडा, हिवरापेन, मुंगसाजी नगर, सवड क्र.३, आसोला खु. क्र.१, दापुरा खुर्द, जगदंबानगर, जनुना, उज्वलनगर, वटफळ क्र.२, फुलउमरी क्र.१, पूर, केकतउमरा, किनखेडा ता. वाशिम, कामठवाडा अशा ३९ अंंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर लवकरच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी सांगितले.

Web Title: Immediate order for construction of 59 Anganwadi in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.