बोंडअळी नुकसान भरपाई तात्काळ द्या ! - शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:47 PM2018-04-12T13:47:08+5:302018-04-12T13:47:08+5:30
वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
वाशिम : हिवाळी अधिवेशनात बोंड अळीसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपााई कोणतेही निकष न लावता तात्काळ देण्याची मागणी शिवसैनिकांनी पालकमंत्री यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्रातील बोंड अळीने नुकसान झालेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाने कोरडवाहु क्षेत्राकरिता हेक्टरी ३०८०० तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपयाची मदत जाहीर केली होती. मात्र ज्या शेतकºयांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल हा निकष चुकीचा आहे. त्यातही कोरडवाहु शेतीकरिता ६८०० तर बागायती शेतीकरिात १३५०० रुपये मदत घोषीत करणे म्हणजे शेतकºयांसोबत क्रुर थटा करणे किवां शेतकऱ्यांना भिक दण्यासारखे आहे. शेतकºयांना शासनाकडुन भिक नको आहे, कृषी विभागाने बि.टी. बियाण्यांच्या नावाने चुकीची बियाणे प्रमाणित करुन शेतकऱ्यांची फसवणुक केलली आहे. नुकतेच कृषी खात्याचे अधिकारी आणि बि.टी. बियाण्यांच्या संगणमताने राज्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशा लुट झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या इटिंलिजंस ब्युरोने चौकशी अहवालात दिली आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकºयांची फसवणुक झाल्याचे सिध्द झाले आहे. म्हणुन ज्या शेतकºयांकडे बि.टी. कापुस बियाण्यांची पावती व कापसाचा पिकपेरा आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपााई मिळाली पाहिजे. हिवाळी अधिवेशनाने बोंड अळीने नुकसान झालेल्या कोरडवाहु शेतीकिरता हेक्टरी ३०८०० रुपये तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपये जाहीर केलेली नुकसान भरपाई कोणतेही निकष न लावता सरसकट व तात्काळ देण्यात यावी व कृषी विभाग व बि.टी. बियाणे कंपनीने कापुस उत्पादक शेतकऱ्यांवर केलेला अन्याय दुर करावा. अन्यथा शिवसेना पुन्हा या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी असे निवेदन शिवसेनेच्यावतिने पालकमंत्र्यांना जिल्हा प्रमुख राजेश पाटील , दिनेश राठोड, डॉ.सुभाष राठोड, हरिष सारडा यासह मान्यवरांनी दिले.