निवडणूक क्षेत्रातील पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:20+5:302021-07-02T04:28:20+5:30
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, ...
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रात लसीकरणासाठी शिबिरे आयोजित करावी. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस या माध्यमातून द्यावा. ज्या पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला नाही, त्यांनाही लस उपलब्ध करून द्यावी. पोटनिवडणूक होत असलेल्या क्षेत्रात जवळपास साडेतीन लाख पात्र व्यक्तींचे लसीकरण प्राधान्याने करावे. पोटनिवडणूक क्षेत्रात निवडणूक कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींची तसेच उमेदवार व त्यांचा प्रचार करणाऱ्या पात्र व्यक्तींचे प्राधान्याने नियोजन करून लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी केले.