खाण्याचा सोडा वापरून घरीच करा गणेशमूर्तींचे विसर्जन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:44 AM2021-09-03T04:44:19+5:302021-09-03T04:44:19+5:30
दरवर्षी वाशिमसह जिल्ह्यातील इतर शहरे व ग्रामीण भागात पीओपीपासून तयार झालेल्या छोट्या स्वरूपातील गणेशमूर्तींची घरोघरी स्थापना केली जाते. शेवटच्या ...
दरवर्षी वाशिमसह जिल्ह्यातील इतर शहरे व ग्रामीण भागात पीओपीपासून तयार झालेल्या छोट्या स्वरूपातील गणेशमूर्तींची घरोघरी स्थापना केली जाते. शेवटच्या दिवशी घरच्या घरीच गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यास प्रदूषण टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी पाण्यात खाण्याचा सोडा घालून त्यात गणेशमूर्ती ठेवावी. दर दोन ते तीन तासांनी मिश्रण काठीने ढवळावे. पुढील ४८ तासांत गणेशमूर्ती विरघळून जाते, अशी माहिती मूर्तिकारांकडून मिळाली.
................
पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री
२०१९ - ३५०००/३२०००
२०२० - ३७०००/३३०००
पीओपी - शाडू मातीचे -
...............
असे असावे खाण्याच्या सोड्याचे प्रमाण
७ ते १० इंच १५ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६
...................
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
मूर्ती विरघळून तयार झालेल्या पाण्यात ‘अमोनियम सल्फेट’ असते. त्यात समप्रमाणात पाणी मिसळवून त्याचा झाडांना खत म्हणून वापर करता येतो.
झाडाच्या एका कुंडीमध्ये ५०० मिली लिटर; तर मोठ्या झाडांना प्रत्येकी दोन लिटर पाणी देता येते. यामुळे झाडांची वाढ होण्यासोबतच पानांचा रंग आकर्षित होतो.
............
४८ तासांत विरघळते मूर्ती
घरच्या बादलीत पाणी घेऊन त्यात खाण्याचा सोडा घालून पूर्ण विरघळावा. निर्माल्य व सजावटीचे साहित्य बाजूला काढून फक्त मूर्ती पाण्यात विसर्जित करावी. दर दोन ते तीन तासांनी मिश्रण ढवळावे. ४८ तासांंत मूर्ती विरघळते. प्लास्टिक पेंटचा थर मूर्तीच्या बाजूला केल्यास मूर्ती लवकर विरघळण्यास मदत होते.
................
कोट :
खाण्याचा सोडा वापरून पीओपीपासून तयार होणाऱ्या गणेशमूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करता येणे सहज शक्य आहे. विशेषत: संपूर्ण कुटुंबीेयांसमवेत लाडक्या गणरायाला डोळ्यांदेखत निरोप दिला जात असल्याने भावना व परंपरा या दोन्ही बाबी साध्य होतात.
- संदीीप शिंदे, मूर्तिकार.