वाशिमात मुस्लिम बांधवांनी केले बाप्पाचे विसर्जन !  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:55 AM2020-09-02T10:55:25+5:302020-09-02T10:56:23+5:30

बाप्पांचे विसर्जन अतिशय मनोभावे करून मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला .  

Immersion of Bappa by Muslim brothers in Washim! | वाशिमात मुस्लिम बांधवांनी केले बाप्पाचे विसर्जन !  

वाशिमात मुस्लिम बांधवांनी केले बाप्पाचे विसर्जन !  

Next

 -नंदकिशोर नारे

वाशिम:      वाशिम शहरात सार्वजनिक व घरगुती स्थापन करण्यात आलेल्या बाप्पांचे विसर्जन बालाजी मंदिरानजिक देव तलावात १ सप्टेंबर रोजी करण्यात आले . बाप्पांचे विसर्जन अतिशय मनोभावे करून मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला .           कोरोनाच्या पृष्ठभूमिवर श्री विसर्जन मिरवणुकीला बंदी करण्यात आली . श्री विसर्जनावेळी गर्दी होवू नये याकरिता नगरपरिषदेतर्फे शहरात २५ ठिकाणी मुर्ती संकलन रथ ठेवण्यात आले होते . या रथामध्ये परिसरातील नागरिकांनी मुर्त्या संकलीत केल्यानंतर त्या देव तलावावर नेवून मुस्लिम बांधवांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले . देव तलावाच्या काठावरून मूर्ती फेकून न देता तलावाच्या मध्यभागी नेवून श्रीं चे विसर्जन करण्यात आले . श्री विसर्जनाकरिता नैसार्गिक आपत्ती जीवरक्षक दलाचे जुम्मा शहा मिसकीन शहा (५३) , सलीम शहा उस्मान शहा, कलीम शहा सलीम शहा, आतिक शहा जुम्मा शहा सर्व रा. वाशिम,  हकीम शहा शेरअली शहा,  इरफान शहा शेर अली शहा , अशफाक शहा इरफान शहा,  सय्यद खाजा सय्यद करीम रा . भगवती जि . हिंगोली यांनी पुढाकार घेतला याकरिता नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते . यावेळी  स्थानिक गुन्हे शाखेचे शिवा ठाकरे, वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारव्दाज यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते .

Web Title: Immersion of Bappa by Muslim brothers in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.