आईच्या अस्थींचे नदीऐवजी शेतात केले विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:39+5:302021-07-01T04:27:39+5:30
माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार पार पाडून अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यामुळे मृतात्म्यास मोक्ष मिळतो, असा ...
माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार पार पाडून अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यामुळे मृतात्म्यास मोक्ष मिळतो, असा समज आहे; परंतु अलीकडच्या काळात नदीपात्रातील पाणी दूषित होऊ नये, या उदात्त हेतूने आईच्या अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता शेतात विसर्जित करीत आहेत. याकामी चिखली झोलेबाबा येथील ज्ञानेश्वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्वर डोंगरे या तिघा भावंडांनी पुढाकार घेतला.
............
पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे यावे- डोंगरे
मृतात्माच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याचा धार्मिक विधी आता पर्यावरणासाठी आणि पर्यायाने मानवी जीवनासाठी धोकादायक ठरत आहे. आधीच घाण झालेल्या नदीपात्रात अस्थी विसर्जित करणे म्हणजे मृताची एकप्रकारे अवहेलना करणे होय. त्यामुळेच आईच्या अस्थी शेतात विसर्जित केल्या, असे ज्ञानेश्वर डोंगरे यांनी सांगितले.