कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक - डॉ. सुनिता लाहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 06:22 PM2020-05-23T18:22:41+5:302020-05-23T18:23:05+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.

   Immunity must be boosted to prevent corona infection - Dr. Sunita Lahore | कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक - डॉ. सुनिता लाहोरे

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक - डॉ. सुनिता लाहोरे

Next

वाशिम : कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद.


कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?
- कोरोना विषाणू संसर्गापासून सावधगिरी म्हणुन  प्रत्येकाने योग्य तो सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहेच. परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीक शक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे.


- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनिक आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग होणे अतिशय आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरिर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध रोगांस शरीरास इजा पोहोचविण्यासपासुन प्रतिबंध करणे आदी. आहारामध्ये भरपुर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी नास्त्यामध्ये इडली सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, बदाम पाण्यात भिजवुन अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल.


- कोणती फळे सेवन करावी ?
 क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. 


- कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?
बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, डिलेव्हरी बॉयकडून खाद्यपदार्थ मागविणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.


- हायड्रेशन कसे ‘मेनटेन’ ठेवावे ?
- दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदि उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज,  खरबुज, संत्रा मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच  आपल्या शरीरास व जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात. त्यामुळे शरीराचे हायड्रेशन मेनटेन ठेवण्यात मदत होते.

Web Title:    Immunity must be boosted to prevent corona infection - Dr. Sunita Lahore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.