सहापैकी चार बाजार समित्यांत ई-नामची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:46 AM2021-09-22T04:46:10+5:302021-09-22T04:46:10+5:30

००००००००००००० काय आहे ई-नाम योजना देशभरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना एकत्र आणणारे राष्ट्रीय कृषी बाजार ...

Implementation of e-name in four out of six market committees | सहापैकी चार बाजार समित्यांत ई-नामची अंमलबजावणी

सहापैकी चार बाजार समित्यांत ई-नामची अंमलबजावणी

Next

०००००००००००००

काय आहे ई-नाम योजना

देशभरातील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार यांना एकत्र आणणारे राष्ट्रीय कृषी बाजार किंवा ई-नाम हे ऑनलाईन पोर्टल आहे. सर्वोत्तम भाव, योग्य बाजारपेठ या पोर्टलच्या माध्यमातून मिळत असते. पोर्टलचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपल्या स्थानिक शेतमालाला देशभरात पोहोचवणे हा आहे. याअंतर्गत सर्व व्यवहार उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहकांमध्ये होत असतो, त्यामुळे यात कोणत्या मध्यस्थांची गरज नसते. आणि कमी खर्चात आपला माल ग्राहकांकडे पोहोचत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो.

०००००००००००००००

ई-नाम शी शेतकरी कसे जुडतील -

ईनाम डॉट गव्ह. डॉट इन या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तेथील सर्च बारवर जाऊन सर्चमध्ये नोंदणी या पर्यायाला क्लिक करून फार्मर हे पर्याय निवडावे आणि आपल्या ईमेल आयडीच्या मदतीने लॉन इन करावे. त्यानंतर तुमच्या इ-मेलवर एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड येतो. त्यानंतर तुम्हाला एक तात्पुरती ईमेल आय़डी आणि पासवर्ड मिळते. याच्या आधारे तुम्ही लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यानंतर सुरु होणाऱ्या डॅशबोर्डमध्ये तुम्ही कागदपत्रांची नोंदणी करु शकता. बाजार समितीकडून मान्यता मिळाली की तुम्ही व्यवहारास सुरुवात करु शकता.

०००००००००००

मानोऱ्यात ९३ शेतकऱ्यांनी विकला शेतमाल

ई-नाम योजनेचा मानोरा बाजार समितीचा प्रारंभ झाल्यानंतर या बाजार समितीत सोमवारी ९३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, मुग, गहू, ज्वारी आदी शेतमालाची विक्री व्यापाऱ्यांना केली, तर कारंजात मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर पाच शेतकऱ्यांनी या अंतर्गत शेतमालाची विक्री केली.

०००००००००००००

कोट: ई-नाम हे शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य दर मिळवून देणारी एक ऑनलाइन बाजारपेठच आहे. या योजनेत खरीदारांसह बाजार समितीचे व्यवहार ऑनलाईन होतात. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळून त्यांची फसवणूक टाळली जाते. शेतकऱ्यांनी यात नोंदणी करावी.

-सुधीर मैत्रेवार,

जिल्हा उपनिबंधक, वाशिम

Web Title: Implementation of e-name in four out of six market committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.