चवदाव्या वित्त आयोगामुळे आले सरपंचपदाला महत्व
By admin | Published: August 12, 2015 12:36 AM2015-08-12T00:36:51+5:302015-08-12T00:36:51+5:30
निधीसाठी लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा; पद मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू.
वाशिम : १४ व्या वित्त आयोगाचा १00 टक्के निधी आता थेट जिल्हा परिषदांकडून ग्राम पंचायतींना मिळणार असल्याने नुकत्याच झालेल्या १६३ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचे महत्व वधारले आहे. त्यातल्या त्यात अल्पावधीतच सरपंच पदाची निवडणुक होत असल्याने केंद्र व राज्याकडून मिळणार्या या निधीच्या लाभासाठी सरपंच पदावर दावे प्रती दावे सुरु झाल्याने ही निवडणुक जिल्हयात रंगतदार होण्याचे सकेत मिळाले आहेत. जिल्हयात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मुदत संपणार्या ४ ऑगस्ट रोजी निवडणुक झाली होती. आता सरपंच पदाच्या निवडीचे वेध १६३ ग्राम पंचायतीमध्ये लागले आहेत. जिल्हयातील बहुतांश ग्राम पंचायत समितीची मुदत ही २५ ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवडयात संपत आहे. त्या अनुषंगाने मुदत संपण्याच्या पुर्व संध्येलाच सरपंच पदाची निवडणुक घेण्याचा जिल्हा निवडणुक विभागाचा मनोदय आहे. दुसरीकडे चवदाव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हयातील ४९३ ग्राम पंचायतींना १३ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. मात्र अद्याप तो सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही. १६३ ग्राम पंचायतीच्या सरपंच निवडी नंतर हा निधी जिल्हयातील ग्राम पंचायतीला मिळणे अभिप्रेत आहे. निवडणुक झालेल्या ग्राम पंचायतीपैकी निम्या ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील सरपंच ग्राम पंचायतीवर विराजमान व्हावा या साठी राजकारण्यांकडून सद्या फिल्डीग लावल्या जात आहे. सोबतच त्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. चवदाव्या वित्त आयोगाची मार्गदर्शक तत्वे अद्याप प्राप्त झाली नसली तरी पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायतीला निधी खर्चा बाबत आता अर्मयाद अधिकार मिळणार असल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तरावरील महत्वाचे सरपंच पद आता चांगलेच प्रकाश झोतात आले आहे. त्यामुळेच या पदावर आपल्या जवळील व्यक्ती बसावी यासाठी जिल्हयातील दिग्गज राजकारणी प्रयत्नात आहेत.