चिमुकल्यांनी रांगोळीतून पटविले वन्य जीवांचे महत्त्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:50 AM2017-10-11T01:50:28+5:302017-10-11T01:50:52+5:30
मंगरुळपीर: मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी होत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशा रांगोळी रेखाटून वन्य जीवांचे महत्त्व पटवून देण्याची किमया साधली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी होत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशा रांगोळी रेखाटून वन्य जीवांचे महत्त्व पटवून देण्याची किमया साधली.
मंगरुळपीर येथे ७ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगरुळपीर येथील सांस्कृतिक भवनात ४ ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत लोकांना पर्यावरण आणि वन्य प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या विषयाशी निगडीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वन्य जीव या विषयावर शनिवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये तालुक्यातील विविध शाळांतील ५0 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित वन्य जीवांचे चित्रण करून त्यांचे महत्त्व आणि आकर्षकता पटवून देण्याची कामगिरी केली. स्पर्धेचे निरीक्षक प्रसिद्ध चित्रकार प्रशांत कर्हे आणि लायनेस क्लबच्या अध्यक्ष चंचल खिराडे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत गीते व मंगरुळपीर वन विभागाच्यावतीने करण्यात आले. या स्पर्धेत सृष्टी शंकर भगत हिने प्रथम, शामल विष्णू भगत हिने द्वितीय, तर स्नेहल प्रताप पडघान हिने तृतिय
क्रमांक पटकावला. त्याशिवाय प्रतिभा सरकटे हिला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सप्ताहात ६ सप्टेंबर रोजी ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेचे निरीक्षण प्रा. अरुण इंगळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. दादाराव पाथ्रीकर, मानवहक्क चळवळीचे सचिन कुळकर्णी यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अतिश सुंदर शब्दांत पर्यावरणाविषयी आपले विचार व्यक्त केले.