दारू अड्डय़ांवर ठिकठिकाणी छापे

By admin | Published: November 20, 2015 02:13 AM2015-11-20T02:13:23+5:302015-11-20T02:13:23+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.

Impressions of raid on liquor bars | दारू अड्डय़ांवर ठिकठिकाणी छापे

दारू अड्डय़ांवर ठिकठिकाणी छापे

Next

वाशिम: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाभरातील २६ अवैध दारूविक्रेते व वरली मटक्यावर छापे टाकून ३९ हजारांचा माल जप्त केला. सदर कारवाया १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी.बी. तडवी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजाकिन्ही येथे नंदू तुकाराम खंडारे यांच्या राहत्या घरी १५ नोव्हेंबर रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये ६३00 रुपये किमतीचा ८0 लीटर सडवा व इतर साहित्य आढळून आले. १६ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोगरी येथील चंद्रभान चव्हाण यांच्या राहत्या घरी छापा टाकला. या छाप्यामध्ये ५५0 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या. १८ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलूबाजार येथील दीपक रामभाऊ हिवरे याला त्याच्या पानपट्टीमधून वरली मटका साहित्य व रोख ८00 रुपयासह अटक केली. अशाप्रकारे जिल्हाभरात एकूण २६ दारूविक्रेत्यावर कारवाया करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ३१ हजार ५२0 रू पयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तडवी, पोलीस उ पनिरीक्षक के.व्ही. इंगळे, पी.बी. सुरोशे, विष्णू भोयर, रामू चौबे, रामेश्‍वर जगताप, सुनील चव्हाण, नंदकिशोर भडके, रवी घरत, मिलिंद गायकवाड यांच्या पथकाने केली. जिल्हय़ात अवैध दारू-वरली मटक्यांचा व्यवसाय चोरपावलांनी पुन्हा येत असल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येते.

Web Title: Impressions of raid on liquor bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.