दरोडाप्रकरणातील आरोपींना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:10 PM2020-03-15T12:10:29+5:302020-03-15T12:10:35+5:30

राजू पाटील राजे यांच्या निवासस्थानी २५ डिसेंबर २०१० रोजी दरोडा पडला होता.

Imprisonment on charges of robbery | दरोडाप्रकरणातील आरोपींना कारावास

दरोडाप्रकरणातील आरोपींना कारावास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : घरातील नोकराला शस्त्राचा धाक दाखवून व जबरीने घरात प्रवेश करून घरातील महिलांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन दरोडेखोर आरोपींना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर यांनी शुक्रवार, १३ मार्च रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील लाखाळा परिसरातील रहिवासी राजू पाटील राजे यांच्या निवासस्थानी २५ डिसेंबर २०१० रोजी दरोडा पडला होता. घटनेच्या दिवशी राजे यांच्या घरी पाहुणे आलेले होते. त्यांच्यासोबत ते रात्रीच्या सुमारास विश्रामगृह येथे गेले होते. अशात रात्री २.३० वाजताच्या सुमारास ५ ते ७ दरेडोखोरांनी राजे यांच्या घराच्या पाठीमागील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला व नोकराला बांधून दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व महिलांना धाक दाखवून महिलांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने तसेच कपाटातील रोकड असा एकूण १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. सर्व दरोडेखोर एम.एच. २१ व्ही. १९२५ या क्रमांकाच्या वाहनाने रिसोडमार्गे पसार झाले.
सदर घटनेची फिर्याद राजू पाटील राजे यांनी शहर पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यावरून आरोपींवर कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यादरम्यान, पोलिसांनी तपासचक्र गतीने फिरवून आरोपी श्याम रामराव मानकर, साहेबराव विट्ठलराव वैद्य, विजयसिंग कृष्णसिंग भादा, ज्वालासिंग रामसिंग कलानी, दत्ता रौंदळे, किरणसिंग काकडसिंग जुन्नी व रविंद्र डोईफोडे अशा ७ आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्यातील ४ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. त्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. आरोपी रविंद्र डोईफोडे हा मयत झाला आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीनंतर विद्यमान न्यायालयाने श्याम मानकर व साहेबराव वैद्य यांना भादवीचे कलम ३९५ मध्ये ७ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास पुन्हा तीन महीने कारावास अशी शिक्षा सुनावली. सबळ पुराव्याअभावी अन्य दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारपक्षा तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सुचिता कुलकर्णी (देशपांडे) यांनी काम पाहिले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Imprisonment on charges of robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.