नादुरुस्त बंधाऱ्यामुळे पाणी थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:19+5:302021-08-17T04:47:19+5:30
---------------- दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढविण्याची धडपड वाशिम : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रियेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ १२ ...
----------------
दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढविण्याची धडपड
वाशिम : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रियेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. प्रत्यक्षात लसी उपलब्ध असताना आणि निर्धारित कालावधी झाला असतानाही नागरिक दुसरा डोस घेण्यात कुचराई करीत आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे.
------------------
शेंग पोखणाऱ्या अळीमुळे सोयाबीन संकटात
वाशिम : जिल्ह्यात पावसाने खंड दिला असताना आता शेंगधारणेवर असलेल्या सोयाबीन पिकावर शेंग पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पीक संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
-------------------
समृद्ध गाव स्पर्धेत बांबू लागवड वेगात
वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यांत समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांत बांबू लागवडीस वेग आला आहे. मनरेगाच्या माध्यमातून कामगारांच्या साहाय्याने आणि सामाजिक वनीकरणच्या सहकार्याने ही बांबू लागवड होत असून, आजवर हजारो बांबूरोपांची लागवड ग्रामस्थांनी केली आहे.
--------------
वाशिम तालुक्यातील प्रकल्प तहानलेलेच
वाशिम : तालुक्यात गत काही दिवसांत दमदार पाऊस पडला असला तरी १० बॅरेज आणि २६ लघुप्रकल्पांत मिळून केवळ २९.०३ टक्के जलसाठा या तालुक्यात झाला आहे. केवळ वारा जहाँगीर आणि खंडाळा खु. हे दोनच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे तालुक्यात पावसाची प्रतीक्षा आहे.