‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:01 AM2017-10-07T02:01:12+5:302017-10-07T02:01:33+5:30
वाशिम: निती आयोगाने सुचविलेले वैद्यकीय व्यवसायविषयक धोरण राज्याच्या आरोग्यविषयक गरजांशी विसंगत असून यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे आयोगाच्या ‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करावी, अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनशी (निमा) संलग्नित डॉक्टरांनी केली. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून त्यांच्यामार्फत थेट पंतप्रधानांकडे निवेदन पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क

संघटनेच्या म्हणण्यानुसार, ‘निमा’ ही आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असून देशभरात संघटनेच्या हजारपेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. ‘निमा’चे डॉक्टर वाडी, वस्ती, झोपड्या, तांडे, दुर्गम प्रदेश, आदिवासी क्षेत्र, ग्रामीण व शहरी विभाग, दुष्काळी प्रदेश याठिकाणी पोहचून गरीब व गरजू रुग्णांना अत्यंत नाममात्र दरात तथा फलदायी वैद्यकीय सेवा सुविधा पुरवत आहेत. ही बाब लक्षात घेवून विधेयकात सुधारणा होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद करून भारतीय उपचार पद्धतीला राष्ट्रीय उपचार पद्धती म्हणून घोषीत करावे, ‘एनसीआयएसएम’ विधेयकात समन्वयात्मक उपचार पद्धती असावी, आयुर्वेदिक औषधीला जीएसटीतून वगळावे, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांंना एमबीबीएसप्रमाणे विद्यावेतन द्यावे, आदी मागण्यांचाही निवेदना त समावेश आहे.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना संघटनेचे डॉ.सुधाकर जिरोणकर, अध्यक्ष डॉ. अजय राठोड, सचिव डॉ. सागर आंबेकर, डॉ. आनंद कंदोई, डॉ. मनीष खपली, डॉ. दिलीप लाहोटी, डॉ. अमोल नरवाडे, डॉ. करूणा अंभोरे (नरवाडे), डॉ. जागृती आंबेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
-
विष प्राशन करून वृद्धेची आत्महत्या!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तालुक्यातील मारसूळ येथील ८0 वर्षीय वृद्ध महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ६ ऑ क्टोबर रोजी उघडकीस आली.
याबाबत वासुदेव अनंतराव भेंडेकर यांनी मालेगाव पोलिसात फिर्याद दिली की , सुभद्राबाई तुकाराम भेंडेकर यांनी त्यांची देखभाल करणारे कुणीही नसल्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग राठोड करीत आहेत.