गायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 04:22 PM2019-01-19T16:22:22+5:302019-01-19T16:22:35+5:30

वाशिम: जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस पाटबंधारे विभागाने बुधवारच्या निर्णयाद्वारे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

 Improved administrative approval for irrigation scheme | गायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

गायवळ लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस पाटबंधारे विभागाने बुधवारच्या निर्णयाद्वारे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
गायवळ येथील प्रकल्पास २१ आॅगस्ट २००८ च्या प्रस्तावानुसार सहा कोटी बत्तीस लाख रुपये इतक्या किंमतीस (दरसूची२००७-०८ वर आधारीत) मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. आता या प्रकल्पास ६ जून २०१५ च्या प्रस्तावानुसार अन्वये बारा कोटी दहा लक्ष रुपये इतक्या किंमतीस (दरसूची २००९-१० वर आधारीत) प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. बांधकामाचे दरम्यान योजनेच्या खर्चात दरसूचीतील बदलामुळे झालेली वाढ, जास्त दराच्या निविदा स्विकृतीमुळे वाढ, भुसंपादन खचार्तील वाढ, संकल्पनातील बदल,इतर कारणे व अनुषंगिक खर्च इत्यादी कारणामुळे वाढ झाली असून योजनेची अद्यावत किंमत प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता किंतीच्या दहा टक्क्यांहून अधिक वाढ असल्यामुळे व सदर प्रकल्प राज्यपालांच्या सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत असल्याने द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणे आवश्यक होते. उपरोक्त बाबीनुसार विदर्भ पाटबंधारे विभागाव्दारे कारंजा तालुक्यातील गायवळ (सं) लघु पाटबंधारे या योजनेच्या एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. त्यापैकी २५ कोटी ७९ लक्ष ३० हजार रुपये फक्त कामाप्रित्यर्थ आणि १ कोटी १४ लक्ष ८० हजार रुपये अनुषंगिक खर्च आहे. अंदाजपत्रकात उर्वरीत कामांसाठी जलसंपदा विभागाची सन २०१६-१७ या वर्षांच्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहेत. या प्रकल्पात २.०३ दलघमी पाणीसाठा होणार असून, या प्रकल्पांतर्गत ३३७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
 

Web Title:  Improved administrative approval for irrigation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.