रिठद पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 03:29 PM2018-05-30T15:29:32+5:302018-05-30T15:29:32+5:30
वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाºया ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये किमतीच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे.
वाशिम : जिल्ह्यातील रिठद (ता.रिसोड) या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाºया ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये किमतीच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे.
यासंदर्भात ३० मे रोजी पारित झालेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे, की रिठद पाणीपुरवठा योजनेस यापूर्वी ४ कोटी ७४ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दर्शविण्यात आली होती. मात्र, जादा दराची निविदा स्विकारल्याने तसेच अन्य अपरिहार्य कारणांमुळे योजनेच्या कामात वाढ झाल्याने खर्चातही १ कोटी ४ लाख ५ हजार रुपये वाढ झाली. त्यामुळे आता ई.टी.पी. चार्जेस वगळून ५ कोटी ७८ लाख १४ हजार रुपये खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील सहा महिन्यात पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित काम पूर्ण करावे, योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी, योजना राबविणे, परिक्षण, दुरूस्त्या आदिंसाठी दरवर्षी आवश्यक असणारा खर्च भागविण्याकरिता संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेस शासनाकडून कुठलाही निधी मिळणार नाही, असे अध्यादेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.