एसटीच्या कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून सुधारीत महागाई भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 04:39 PM2019-10-26T16:39:40+5:302019-10-26T16:39:46+5:30
नोव्हेंबर महिन्यापासून अनुज्ञेय करण्याच्या सुचना महामंडळाने २४ आॅक्टोबरच्या परिपत्रकानुसार दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासन निर्णयान्वये १ जानेवारी २०१९ पासून कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांना या निर्णयानुसार सुधारीत महागाई भत्ता नोव्हेंबर महिन्यापासून अनुज्ञेय करण्याच्या सुचना महामंडळाने २४ आॅक्टोबरच्या परिपत्रकानुसार दिल्या आहेत.
राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचाºयांच्या महागाई भत्त्यात १ जानेवारी २०१९ पासून वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली असल्याने पूर्वीच्या ९ टक्क्यांऐवजी आता १२ टक्के महागाई भत्ता शासकीय कर्मचाºयांना लागू आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळानेही (एसटी) त्यांच्या कर्मचाºयांना महागाई भत्त्यातील वाढ लागू केली आहे; परंतु या वाढीव भत्त्यानुसार अद्याप एसटी कर्मचाºयांना रक्कम मिळालेली नाही. आता एसटी महामंडळाने २४ आॅक्टोबर रोजी या संदर्भात परिपत्रक जारी करून आॅक्टोबर महिन्यातील वेतनावर शासन निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्यात महागाई भत्ता अदा करण्याचे निर्देश दिले असून, पुढे वाढीव रकमेनुसारच महागाई भत्ता एसटी कर्मचाºयांना मिळणार आहे. तथापि, जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ दरम्यानच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी अदा करण्याबाबत अद्याप कोणतेही निर्देश देण्यात आले असून, ही थकबाकी अदा करण्याबाबत यथावकाश निर्देश देण्यात येणार असल्याचे महामंडळाने या संदर्भातील परिपत्रकात नमूद केले आहे.