शिरपूर येथील घटनेच्या निषेधार्थ वाशिमात माेर्चा व शहर कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 01:03 PM2023-01-17T13:03:10+5:302023-01-17T13:03:21+5:30
१४ जानेवारी रोजी एका समाजकंटकाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केली होती.
वाशिम : शिरपूर येथील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध संघटनांसह नागरिकांनी १७ जानेवारी रोजी वाशिमात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच यावेळी संपूर्ण शहरातून मोर्चा काढण्यात आला .
१४ जानेवारी रोजी एका समाजकंटकाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केली होती. या घटनेचा निषेध आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी १७ जानेवारी रोजी वाशिम बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली.
शहरातील शाळा, महाविद्यालय, भाजीपाला, दूध डेअरी, अत्यावश्यक सेवेतील प्रतिष्ठानेसुद्धा बंद ठेवण्यात आली होती. यावेळी वाशिम शहरातून आराेपिवर कठाेर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भव्य माेर्चा काढण्यात आला यामध्ये महिलांचाही माेठया प्रमाणात समावेश हाेता.