३० वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या; पोलिसांचा तपास सुरू
By सुनील काकडे | Updated: May 31, 2024 19:28 IST2024-05-31T19:28:25+5:302024-05-31T19:28:30+5:30
याप्रकरणी शहर पोलिसांत दाखल फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

३० वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या; पोलिसांचा तपास सुरू
वाशिम : जिल्ह्यातील कारंजा येथे माळीपूरा भागात वास्तव्यास असलेल्या सिद्धांत महादेवराव जुंबळे (३०) या युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ३० मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सिद्धांतचा मृतदेह आढळून आला. कुटुंबियांनी पोलिसांना याबाबत अवगत केले. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविला. ३१ मे रोजी सिद्धांतवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने आत्महत्या नेमकी का केली, याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलिसांत दाखल फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस करीत आहे.