ऑनलाईन’ दिसतेय केंद्र; मतदार यादीत नावे गहाळ!
By सुनील काकडे | Published: April 26, 2024 12:37 PM2024-04-26T12:37:42+5:302024-04-26T12:38:59+5:30
लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांकरिता निवडणूक विभागाने ‘ऑनलाईन लिंक’ जारी केली आहे.
सुनील काकडे, वाशिम : लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणाऱ्या मतदारांकरिता निवडणूक विभागाने ‘ऑनलाईन लिंक’ जारी केली आहे. त्याद्वारे मतदान केंद्र माहित करून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने दर्शविण्यात आलेल्या ठराविक केंद्रांमधील मतदार यादीत अनेकांची नावेच नसल्याचा प्रकार वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील मतदान केंद्रावर घडला. यामुळे संबंधित मतदारांतून नाराजीचा सूर उमटला.
निवडणूक विभागाकडून मतदारांच्या सोयीसाठी ‘इलेक्टोरलसर्च डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट ईन’ ही लिंक देण्यात आली आहे. ती अनेकांसाठी अत्यंत लाभदायी ठरली आहे. मात्र, काही मतदारांच्या बाबतीत ऑनलाईन दर्शविण्यात आलेल्या केंद्रांमधील मतदार यादीत संबंधितांची नावेच नसल्याचा प्रकार घडला. यामुळे मतदार यश युवराज येरले, आकाश अलोणे यांनी नाराजी व्यक्त केली.