वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम

By संतोष वानखडे | Published: September 17, 2023 03:39 PM2023-09-17T15:39:00+5:302023-09-17T15:39:09+5:30

सुभाष चौक स्थित श्री संभवनाथ श्र्वेतांबर जैन मंदिर व गुरुवार बाजार स्थित श्री वर्धमान जैन स्थानक येथे सकल श्वेतांबर जैन समाजाच्या वतिने पर्युषण पर्व उत्साहात साजरे करण्यात येत आहे.

in Washim Paryushan Parva in excitement Shwetambara Jain Samajam procession, various programs | वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम

वाशिमात पर्युषण पर्व उत्साहात! श्वेतांबर जैन समाजातर्फे शोभायात्रा, विविध कार्यक्रम

googlenewsNext

वाशिम: येथील सुभाष चौक स्थित श्री संभवनाथ श्र्वेतांबर जैन मंदिर व गुरुवार बाजार स्थित श्री वर्धमान जैन स्थानक येथे सकल श्वेतांबर जैन समाजाच्या वतिने पर्युषण पर्व उत्साहात साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने वाशिम शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. १२ ते १९ सप्तेंबर पर्यंत सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यात मुंबई येथे चातुर्मास करित असलेले परमपूज्य आचार्य श्री देवकिर्ती सूरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने मुंबई येथून आलेले मनन जैन, यथार्थ जैन व चितरांग जैन हे कल्पसूत्रचे वाचन करित आहेत.

 जैन स्थानक येथे शिर्डी व पुणे येथुन आलेल्या स्वाध्याई भगिनी सुवर्णा लोढ़ा, ललिता लुनावत व छाया बुरड या अंतगढ़ सूत्रचे वाचन करीत आहेत. आठ दिवस चालणाऱ्या पर्युषण पर्वमध्ये १३ वर्षीय बालिका रिया अतुल संचेती हीने निरंकार तीन उपवासाची तपस्या केली तर ७० वर्षीय श्रावक सुभाषचंद्र संचेती यांनी सुद्धा निरंकार उपवास सुरु केले असुन रविवारी त्यांचा पाचवा निरंकार उपवास आहे. श्रविका प्रीति नवीन मालिया व प्रज्ञा पलाश मालिया यांनी निरंकार तीन दिवसीय उपवास तपस्या सुरु केली आहे. 

त्याग तपद्वारे आत्म शुद्धिच्या या पर्वमधे विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असुन दैनंदिन स्नात्र पूजा, अष्टप्रकारची पूजा, प्रतिमांची आकर्षक व सुंदर वेशभूषा सजावट, प्रार्थना, प्रवचन, सामायिक, प्रतिक्रमण, जप, तप, त्याग, नियम एकासन, उपवास, आयंबिल उपवास आदिमधे समाजबंधु, श्रावक व श्राविका उत्साहात सहभाग घेत आहेत. चवदा स्वप्न व भगवान श्री महावीर स्वामी यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येवुन वाशिम शहरातून वाजत गाजत शोभायात्रा काढन्यात आली.

Web Title: in Washim Paryushan Parva in excitement Shwetambara Jain Samajam procession, various programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम