वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा निषेध

By नंदकिशोर नारे | Published: January 11, 2024 02:25 PM2024-01-11T14:25:15+5:302024-01-11T14:25:28+5:30

कार्यकर्त्यांनी ११ जानेवाारी रोजी दुपारी १२ वाजता वाशिमातील पाटणी चौकात निर्णयाचा निषेध केला. तसेच विविध घोषणाबाजी करण्यात आली.

In Washim, Thackeray's Shiv Sena office-bearers protested the Speaker's decision | वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा निषेध

वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा निषेध

 वाशिम : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल बुधवारी(दि.१०) दिला. तसेच भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप हा वैध असल्याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ११ जानेवाारी रोजी दुपारी १२ वाजता वाशिमातील पाटणी चौकात या निर्णयाचा निषेध केला. तसेच विविध घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुधीर कव्हर यांनी या निर्णयावर टीका केली आणि ही हुकूमशाही असल्याचे म्हटले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुधीर कव्हर,  सुरेश मापारी, माणिकराव देशमुख, गजानन भांदुर्गे, नागोराव ठेंगडे, नितिन मडके, कॅप्टन प्रशांत सुर्वे, राजुभैय्या पवार, गजानन मते पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: In Washim, Thackeray's Shiv Sena office-bearers protested the Speaker's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम