अपेक्षित दराअभावी सोयाबीनची आवक घटली

By admin | Published: January 24, 2017 04:59 PM2017-01-24T16:59:47+5:302017-01-24T16:59:47+5:30

अपेक्षित दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण असून, जिल्ह्यातील विविध

Inadequate soybean arrivals due to expected rates | अपेक्षित दराअभावी सोयाबीनची आवक घटली

अपेक्षित दराअभावी सोयाबीनची आवक घटली

Next
>ऑनलाइ लोकमत
 वाशिम, दि. 24 -  अपेक्षित दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण असून, जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटल्याचे दिसत आहे.
यंदा जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. अपवादात्मक परिस्थिती वगळता वातावरण आणि पावसाची चांगली साथ मिळाल्याने या पिकाचे उत्पादनही बऱ्यापैकी झाले; परंतु शासनाच्या हमीभावाने शेतकºयांना निराश केले. अवघे २ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल दर शासनाने सोयाबीनला जाहीर केले. गरजेपोटी सोयाबीन विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकले; परंतु काही शेतकरी भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत होते. तथापि, या पिकाचे भाव वाढण्याऐवजी घटत असल्याने शेतकरी निराश असून, त्यांनी बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसते. जिल्ह्यात सरासरी २० हजार क्विंटल सोयाबीनची आवक जानेवारीच्या सुरूवातीला होत असताना आता त्यात तब्बल पाच हजार क्विंटलची घट झाल्याचे बाजार समित्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एकट्या कारंजा बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी १६ जानेवारी रोजी सात हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तर हीच आवक अवघ्या १० दिवसांत ५ हजार ५०० क्विंटलवर येऊन ठेपली. वाशिम येथील बाजार समितीमध्ये १० जानेवारी रोजी ७ हजार ५८८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. ती २३ जानेवारी रोजी ६ हजार ५०० क्विंटलवर आली आहे. रिसोड, मानोरा, मालेगाव आदि ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. शेतकºयांकडे अद्यापही सोयाबीन मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे; परंतु बाजार समित्यांमध्ये अपेक्षित दरच मिळत नसल्याने शेतकºयांनी सोयाबीन विकण्याचा विचार सद्यस्थितीत स्थगित ठेवल्याचे दिसत आहे. सोयाबीनच्या दराचा विचार करता कारंजा बाजार समितीमध्ये १६ जानेवारी रोजी सोयाबीनला सरासरी २३ जानेवारीला सरासरी २ हजार ६४५ रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही पाहायला मिळत आहे. 

Web Title: Inadequate soybean arrivals due to expected rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.