इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:06+5:302021-07-25T04:34:06+5:30
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कौशल्य विकास केंद्र वाशिमच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि ...
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कौशल्य विकास केंद्र वाशिमच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि इनरव्हीलच्या प्रार्थनेने झाली. मागील वर्षीच्या अध्यक्ष साधना नेनवाणी यांनी त्यांनी राबविलेल्या सर्व प्रोजेक्टची माहिती यावेळी सांगितली. या सर्व उपक्रमाचे बुलेटीनचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. नवीन वर्ष २०२१ - २०२२ च्या अध्यक्षा डॉ. मेघा देशमुख यांना क्लबचे चार्टर व कॉलर पास्ट प्रेसिडेंट साधना नेनवाणी यांनी प्रदान केली व अध्यक्षपदाचा कार्यभार सुपुर्द केला.
प्रमुख पाहुणे सुनंदा बजाज यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याचे काैतुक केले. नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी यावर्षी राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट आणि थीम याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन आयएसओ डॉ. शुभांगी दामले यांनी केले तर आभार प्रदर्शन विना चरखा यांनी केले. याप्रसंगी पाेस्ट प्रेसिडेंट विजया देशपांडे, कमल गुलाटी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी शांती निकेतन स्कूलचे अध्यक्ष मुकेश चरखा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
..........
क्लबमध्ये नव्याने आलेल्यांचा सत्कार
नवीन टीममध्ये सचिव संगीता देशमुख, उपाध्यक्ष विना चरखा, आयएसओ डॉ. शुभांगी दामले, सीसी रुची विसपुते, ट्रेझर हेमा विसपुते, मंगल शिंदे, या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच यावर्षी क्लबमध्ये नव्याने मेंबर म्हणून आलेल्या डॉ. पूजा राठी, मनिषा कड, प्रियंका राठी आणि साबू यांचे देखील स्वागत करण्यात आले.