मोहरी येथे ग्रामस्थांच्या हस्ते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:03 PM2018-04-10T15:03:39+5:302018-04-10T15:03:39+5:30
मोहरी : येथे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन मोहरी येथ्ीाल ग्रामस्थाच्याहस्ते करण्यात आले. गाव पाणीदार करण्यासाठी व पाण्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते मार्फत ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाची ही स्पर्धा आहे.
मोहरी : येथे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन मोहरी येथ्ीाल ग्रामस्थाच्याहस्ते करण्यात आले. गाव पाणीदार करण्यासाठी व पाण्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते मार्फत ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाची ही स्पर्धा आहे.
यामध्ये श्रमदान, मशीन यंत्राच्या सहा्याने खोदकाम आहे. त्यानंतर गावाच्या दुप्पटर रोपटे तयार करणे म्हणजे नर्सरी तयार करणे, माती परिक्षण करणे , शेततळे सिमेंट प्लॅग इतर कामे या ४५ दिवसात करणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १०० मिटर खोदकाम झाले असुन गावातील मंडळीचा मोठा सहभाग दिसुन आला. सलग ४५ दिवस गावकरी श्रमदान करतील व गाव पाणीदार होण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील. यामध्ये महिलांचा भरपुर सहभाग होता. मोहरी येथे सर्व प्रथम विठ्ठल रुख्माई मंदिरात टिकास, फावडे, टोपले, विठ्ठलाचे पुजन करण्यात आले. व गावातुन मोठी रॅली काढुन बौध्द विहारात बाबाबसाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
ई क्लास शिवारात भुमातेचे पुजन करुन या कामाचे उद्घाटन सरपंच संजय गावंडे यांच्याहस्ते करुन कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पाणी फाउंडेशनची टिम हे काम बघण्यातही मोहरीला आली व त्यांनी श्रमदान करणाºयांना मार्गदर्शन केले. पाण्याच्या दुष्काळाविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मोहरी सरपंच संजय गावंडे ,उपसरपंच संगीत इंगोले सदस्य, विनायक मिसाळ , अॅड.मनिष म्हातारमारे ,निता पाटील, शांताबाई ठाकरे, रेखा म्हातारमारे, उज्वल मिसाळ, बेबीबाई इंगोले, माजी सरपंच प्रकाशराव म्हातारमारे, नितीन गावंडे, निलेश मिसाळ, गोपाल मिसाळ, रवि एडोले, नारायण म्हातारमारे, संदेश इंगोले, किरण मिसाळ, रुख्मीना निलटे, अनेक महिला उपस्थित होत्या.