मानोरा तालुक्यातील ६१४ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता वितरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 04:30 PM2020-04-26T16:30:28+5:302020-04-26T16:30:50+5:30
प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे ६ लाख १४ हजारांचा प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या आशा, अंगणवाडी सेविकांसह मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी आणि केंद्रचालक अशा एकूण ६१४ कर्मचाºयांना प्रत्येकी हजार रुपयांप्रमाणे ६ लाख १४ हजारांचा प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्यासह प्रशासकीय पातळीवरून राबविण्यात येणाºया विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्तरावर कार्यरत आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी आणि केंद्रचालकांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन करून ६१४ कर्मचाºयांना प्रत्येकी हजार रुपये याप्रमाणे ६ लाख १४ हजारांच्या प्रोत्साहन भत्त्याचे वितरण करण्यात आले.