पोलीस पाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:14+5:302021-06-06T04:30:14+5:30
00 रिसोड तालुक्यात सात रुग्ण आढळले वाशिम : रिसोड तालुक्यात सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ जून रोजी पॉझिटिव्ह ...
00
रिसोड तालुक्यात सात रुग्ण आढळले
वाशिम : रिसोड तालुक्यात सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल ४ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये रिसोड शहरातील एक तर डोणगाव, कवठा, केनवड, मसला पेन, रिठद, सवड येथील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे.
00
व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब!
वाशिम : सध्या वाशिम येथील बाजारपेठेतील व्यवहारातून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे दिसत आहे. साडेतीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहावे लागले होते.
००००
छोट्या मालवाहू वाहनातून जडवाहतूक
वाशिम : छोट्या स्वरूपातील मालवाहू वाहनांच्या टपावर गज, स्प्रिंकलर पाईप, अँगल अशा जड वस्तूंची वाहतूक केली जात असल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
000
केनवड परिसरात सुविधांचा अभाव
वाशिम : केनवड जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील दलित वस्तीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००००
अनसिंग येथे आणखी तीन रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल ५ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
००००