संचारबंदीत अत्यावश्यक सेवेत मदत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:57 PM2020-05-03T17:57:07+5:302020-05-03T17:58:58+5:30
प्रतिकर्तव्य ३०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने ३० एप्रिल रोजी घेतला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी लागू संचारबंदीत शासकीय कर्मचारी, वैद्यकीय व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीस सहकार्य करण्यास किंवा त्यांना ने-आण करण्यास मदत करणाºया राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) चालक, वाहक व पर्यवेक्षकांना प्रतिदिन, प्रतिकर्तव्य ३०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने ३० एप्रिल रोजी घेतला आहे. सर्व विभागीय नियंत्रकांना त्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने २३ मार्चपासून संचारबंदी लागू केली आहे. सदर कालावधित रेल्वे व वाहतुकीची इतर सर्व उपलब्ध साधने बंद ठेवण्यात आली आहेत. अशा आणीबाणीच्या प्रसंगी शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना त्यांचे कर्जव्य बलावण्यासाठी त्यांची ने-आण करणे अत्यावश्यक असल्याने त्याबाबतची जबाबदारी शासनाने राप. प. महामंडळावर सोपविली आहे.
त्या अनुषंगाने चालनीय तसेच प्रशासकीय कामकाजासाठी मुंबई, ठाणे, पालघरसह संबंधित जिल्हाधिकाºयांच्या सुचनेनुसार एसटी महामंडळाच्या काही विभागातील व मध्यवर्ती कार्यालयातील चालक, वाहक, यांत्रिक, पर्यवेक्षकीय, तसेच प्रशासकीय कर्मचारी हे विशेष जोखीम स्विकारून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. अशी सेवा बजावणाºया कर्मचाºयांना इतर विभागातून आलेल्या व प्रत्यक्ष कामगिरी बजावत असलेल्या सदर कर्मचाºयांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, सदर विशेष प्रोत्साहन भत्ता २३ मार्च पासून ते संचारबंदी कालावधी उठेपर्यंत कर्तव्य बजावणाºया कर्मचाºयांना अनुज्ञेय राहणार आहे.