भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:20+5:302021-02-23T05:02:20+5:30
वाशिम शहरातील गर्दी नियंत्रणाबाहेर वाशिम : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासनाच्या आदेशाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ...
वाशिम शहरातील गर्दी नियंत्रणाबाहेर
वाशिम : कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासनाच्या आदेशाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सुरू राहून त्यानंतर बंद होत आहेत. मात्र, याच वेळेत गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.
............
उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
वाशिम : वाशिम-पुसद रोडवर उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. असे असताना संथ गतीमुळे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे.
...............
रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष
मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हे दाखल झाले; मात्र या प्रकरणाचा तपास अत्यंत संथगतीने सुरू असून, बहुतांश आरोपी अद्याप हाती लागलेले नाहीत.
..................
बसस्थानकात मिळेना पिण्याचे पाणी
वाशिम : स्थानिक बसस्थानकात पिण्याच्या शुद्ध पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. यामुळे प्रवासी वैतागले आहेत. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी महेश धोंगडे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली.
..............
चाचणी करून घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना संसर्गाचे वेळेत निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.