अपूर्ण कामाची पाहणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:32 PM2017-10-11T13:32:05+5:302017-10-11T13:32:13+5:30

Incomplete work survey! | अपूर्ण कामाची पाहणी !

अपूर्ण कामाची पाहणी !

Next
ठळक मुद्देरोहयो योजना : काम पूर्ण करण्याची ग्वाही

रिठद : रिठद ते पार्डी तिखे या दरम्यानच्या अपूर्ण राहिलेल्या रस्ता कामाची पाहणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी केली असून, सदर काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

रिठद ते पार्डी तिखे या रस्त्याला रोजगार हमी योजनेतून सन २००१ मध्ये  मंजूरात मिळाली होती. मार्च २००३ पर्यंत सदर काम पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, अद्यापही काम पूर्ण झाले नाही. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते नारायण आरू यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत उपजिल्हाधिकारी कोरडे यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. यावेळी रोहयोचे नवघरे, नारायण आरू यांची उपस्थिती होती. अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी आरू यांनी केली. अपूर्ण काम पूर्ण करण्याची ग्वाही कोरडे यांनी दिली.

Web Title: Incomplete work survey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.