दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:07+5:302021-05-19T04:42:07+5:30
ग्रामीण भागातील दलित वस्तींचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत दलित ...
ग्रामीण भागातील दलित वस्तींचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते, पथदिवे, सामाजिक सभागृह, पाणीपुरवठ्याची सुविधा आदी कामे घेतली जातात. कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून या योजनेंतर्गतची कामे प्रभावित होत आहेत. हराळ, रिठद, अडोळी, तोंडगाव, उकळीपेन, अनसिंग, काटा, मेडशी, शिरपूर, केनवड, किन्हीराजा, तामशी, शेलुबाजार यासह अनेक जिल्हा परिषद गटातील गावांतील काही दलित वस्तींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मूलभूत सुविधांसाठी कामे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. कामे मंजूर झाल्याने काही गावातील दलित वस्तींमध्ये कामे करण्यात आली, तर काही ठिकाणी अजून कामे येणे बाकी आहे. कोरोनामुळे कामेही प्रभावित होत असल्याचे दिसून येते.