बँका बंदमुळे नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:54+5:302021-03-28T04:38:54+5:30

........... जऊळका येथे विशेष मोहीम वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विशेष मोहीम हाती घेण्यात ...

Inconvenience to citizens due to closure of banks | बँका बंदमुळे नागरिकांची गैरसोय

बँका बंदमुळे नागरिकांची गैरसोय

Next

...........

जऊळका येथे विशेष मोहीम

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून उघड्यावर शाैचास जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.

............

मुलाच्या मृत्यूप्रकरणी न्यायाची मागणी

मेडशी : येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुकांडा येथे मजुरीचे काम करणाऱ्या २४ वर्षीय मुलाचा पोकलन व टिप्परच्या मध्ये येऊन मृत्यू झाला. याप्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी मृत मुलाच्या आईने मालेगाव पोलिसांकडे केली आहे.

................

किन्हीराजात उद्भवली पाणीटंचाई

वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे गेल्या काही दिवसापासून काही भागात कृत्रिम पाणीटंचाई उद्भवली आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष पुरवून नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

...........

पाटणी चाैकात रस्ता दुभाजकाची मागणी

वाशिम : नागरिकांच्या गर्दीने सदैव गजबजणाऱ्या शहरातील पाटणी चाैकातील मुख्य रस्त्यात लोखंडी बॅरिकेड्‌स लावण्यात आले आहेत. ते हटवून दुभाजक उभारण्यात यावे, अशी मागणी संदीप चिखलकर यांनी बांधकाम विभागाकडे शुक्रवारी केली.

................

पोलीस ठाण्यातील वाहने झाली भंगार

वाशिम : स्थानिक ग्रामीण पोलीस स्टेशनने गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या वाहनांचा निपटारा झाला नाही. यामुळे सदर वाहने ठाण्याच्या आवारात उभी राहून जागीच भंगार झाली आहेत. यामुळे विद्रुपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.

...................

लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज

वाशिम : १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षे वयोगटापेक्षा अधिकच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करण्याची धावपळ सध्या सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.

Web Title: Inconvenience to citizens due to closure of banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.