रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:38+5:302021-06-09T04:50:38+5:30
शिरपूर येथे दूध उत्पादकांचे नुकसान वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात असंख्य दूध उत्पादक शेतकरी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ...
शिरपूर येथे दूध उत्पादकांचे नुकसान
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात असंख्य दूध उत्पादक शेतकरी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी हॉटेल्स बंद राहत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
किन्हीराजा येथे लसीकरण मोहीम
वाशिम : मालेगाव-कारंजा रस्त्यावर असलेल्या किन्हीराजा येथे ज्येष्ठ नागरिक नंतर आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जात आहे. ही मोहीम येथे सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात उद्भवली पाणीटंचाई
जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे भागात ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा अनियमित असल्याने येथे पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.
मेडशी परिसरात वन्यप्राण्यांचा त्रास
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला पिकांची लागवड केली ; मात्र माकड, रोही, हरिण यासारख्या वन्यप्राण्यांचा त्रास आहे.