पावसामुळे शेतक-यांची बाजारात धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 07:52 PM2017-10-12T19:52:02+5:302017-10-12T19:54:59+5:30

गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे.

inconvenient for the farmer's due to rain | पावसामुळे शेतक-यांची बाजारात धांदल

पावसामुळे शेतक-यांची बाजारात धांदल

Next
ठळक मुद्देबाजार समित्यांची पंचाईतशेतमाल विकण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे. सणासुदीच्या तयारीसाठी शेतमाल विकण्यासाठी बाजारात येणेही पावसामुळे अडचणीचे झाले आहे. त्यातच बाजारात आलेल्या मालाचा लिलाव करून तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनालाचीही मोठी पंचाईत होत असल्याचे दिसत आहे. 
यंदाच्या खरीप हंगामातील मुग, उडिद आणि सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येणे सुरू झाले आहे. त्यातच सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, आता सणासुदीसाठी शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत; परंतु परतीच्या पावसाने त्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. बाजारात माल आणताना तो ओला होऊ नये, बाजारात माल ठेवण्यास सुरक्षीत जागा असावी, अशी चिंता त्यांना पडत आहे. बाजार समित्या आपल्या परीने शेतकºयांच्या मालाची काळजी घेत असल्या तरी, बाजारातील ओट्यावर आलेल्या मालाच्या लिलावानंतर तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. आता बाजारातील शेडखाली ठेवलेला शेतकºयांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापाºयांना लिलावानंतर तो मोजून घेण्यात अडचणी येत आहेत. कशीबशी जागा करून आपला माल ओला होऊ नये, याची खबरदारी शेतकरी आणि व्यापारीही घेत आहेत. 

Web Title: inconvenient for the farmer's due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.