ग्रामीण भागांत कोरोना संसर्गात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:55+5:302021-02-24T04:42:55+5:30

--------- जानोरीत गांडूळ खत युनिटची तयारी वाशिम: कारंजा तालुक्यातील जानोरी गावात सेंद्रीय शेती गटाने ३१ गांडूळ ्नखत युनिटचे बांधकाम ...

Increase in corona infection in rural areas | ग्रामीण भागांत कोरोना संसर्गात वाढ

ग्रामीण भागांत कोरोना संसर्गात वाढ

Next

---------

जानोरीत गांडूळ खत युनिटची तयारी

वाशिम: कारंजा तालुक्यातील जानोरी गावात सेंद्रीय शेती गटाने ३१ गांडूळ ्नखत युनिटचे बांधकाम करण्याचा संकल्प केला असून, येत्या ४ दिवसात हे काम पूर्ण करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

-----

चार गावांत जॉब कार्ड नोंदणी

वाशिम: समृद्ध गाव स्पर्धेत रोहयोच्या माध्यमातूनही विविध कामे केली जाणार आहेत. त्यासाठी कामगारांची जॉब कार्ड नोंदणी सुरू असून, मंगळवारी मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील चार गावांत ही नोंदणी करण्यात आली.

------------

महाबीजकडून तूर खरेदी

वाशिम: गतवर्षीच्या हंगामात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पात तुरीचे उत्पादन करणाºया शेतकºयांकडील तुरीची खरेदी महाबीजने सुरू केली असून, यात सोमवार आणि मंर्गळवारी मिळून ७५० क्विंटल तूर घेण्यात आली.

----------------

३९ वाहनांवर कारवाई

वाशिम: शहर वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करताना आढळलेल्या विविध ३१ वाहनांवर मंगळवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने हेल्मेट, कागदपत्रे नसणे आणि आसन मर्यादेच्या उल्लंघन प्रकरणी कारवाई झाली.

----------

महामार्गावरील खड्ड्यामुळे अपघाताची भिती

वाशिम: वाशिम-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ई वर मंगरुळपीर बसस्थानकानजीक जलवाहिनीच्या व्हॉल्वसाठी बांधकाम करण्यात आले. त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यावरील झाकण मोडल्याने अपघाताची भिती आहे.

---------

पार्किंग नियमांचे उल्लंघन

वाशिम: शहरातील विविध शासकीय कार्यालयात पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पार्किंगची जागा सोडून प्रवेशद्वारासमोर वाहने उभी करण्यात आल्याचे मंगळवारी दिसून आले.

-------------

ेचेकपोस्टवरील मोहिमेची पडताळणी

वाशिम: कारंजा तालुक्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी पाच चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. या चेकपोस्टला सोमवारी तहसीलदार धिरज मांजरे यांनी भेट देऊन पडताळणी केली.

Web Title: Increase in corona infection in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.