डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचे बजेट वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:28+5:302021-02-08T04:35:28+5:30

पूर्वी शेतीची कामे बैलांद्वारे केली जात होती. बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी आशा प्रकारची सर्व कामे केली जात ...

The increase in diesel prices has increased the budget for agriculture | डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचे बजेट वाढले

डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचे बजेट वाढले

Next

पूर्वी शेतीची कामे बैलांद्वारे केली जात होती. बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी आशा प्रकारची सर्व कामे केली जात होती. यामध्ये कुठलाही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायची, प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवीत असे, बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा, आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही आशा प्रकारचे समीकरण तयार झालेले होते. परंतु बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले. शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला. मागील दोन दशकांपासून शेतीत आमूलाग्र बदल झाला. यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होत असल्याने शेती मशागतीला यांत्रीकरणाची जोड लागली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, शेतमाल वाहतूक, रोटाव्हेटर फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. मात्र डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी कामांचे दर वाढवले. पर्यायाने शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. आता प्रति एकर नांगरणी १८०० रुपये, रोटरव्हेटर २०० रुपये, फवारणी १६०० रुपये, वाफे तयार करणे १६०० रुपये, तर सरी पाडणे १००० रुपये असा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

---------

कोट: धावपळीच्या युगात शेतीची कामे लवकर व्हावीत यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. आज जवळपास सर्व शेतकरी ट्रॅक्टरची शेती करीत आहेत, परंतु डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेती मशागतीचे दर वाढले आहेत. शेती आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. शासनाने शेतीच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या अवजारांसाठी डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-उध्दवराव मुटकुळे, शेतकरी, मोरगव्हाण

कोट : डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करावयाच्या कामांचे दर वाढवावे लागले, खर्च आणि शिल्लक यांचा ताळमेळ बसत नसल्याने तोट्यात धंदा जाऊ लागला. कोणताही व्यवसाय तोट्यात करणे शक्य नाही म्हणून दर वाढले त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

- पुरुषोत्तम गरकळ, ट्रॅक्टर मालक

Web Title: The increase in diesel prices has increased the budget for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.