आता वसतिगृह कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:32 PM2019-07-10T12:32:35+5:302019-07-10T12:35:36+5:30
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वसतिगृह कर्मचाºयांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ८ जुलै रोजी घेतला.
वाशिम : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाºया अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात १५ टक्के वाढ झाली असून, याचा लाभ पश्चिम वºहाडातील जवळपास ८५० कर्मचाºयांना मिळणार आहे.
मागासवर्गीय प्रवगार्तील विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा, ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे, आर्थिक दुरवस्थेमुळे मागासवर्गीय पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदानित वसतिगृहे चालविण्यात येतात. या अनुदानित वसतिगृहासाठी अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदार आदी पदे भरली जातात. महागाईच्या काळात मिळणारे तुटपूंजे अनुदान हे दैनंदिन गरजा भागविण्यास अपूरे पडते, अशा व्यथा कर्मचाºयांनी शासन दरबारी मांडल्या होत्या. दुसरीकडे अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणीही विविध स्तरातून झाली होती. याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वसतिगृह कर्मचाºयांच्या मानधनात १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय ८ जुलै रोजी घेतला. याचा लाभ पश्चिम वºहाडातील जवळपास ८५० कर्मचाºयांना होणार आहे.
यापूर्वी वसतिगृह अधीक्षकांना ८ हजार रुपये मानधन होते. आता त्यांना ९२०० रुपये मानधन मिळणार आहे. स्वयंपाकी सहा हजारावरून ६९०० तर मदतनीस व चौकीदार यांना प्रत्येकी पाच हजाराऐवजी आता ५७५० रुपये मानधन मिळणार आहे.