अडाण प्रकल्पाच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:20+5:302021-07-23T04:25:20+5:30

वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय वाशिम : कामरगाव परिसरातील गावांत विद्युतपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गुरुवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच ...

Increase in the level of Adana project | अडाण प्रकल्पाच्या पातळीत वाढ

अडाण प्रकल्पाच्या पातळीत वाढ

Next

वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय

वाशिम : कामरगाव परिसरातील गावांत विद्युतपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. गुरुवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.

नाल्यांच्या सफाईबाबत उदासीनता

वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांच्या साफसफाईबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून मानोरा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

वाशिम : जिल्ह्यात एसटी बसेस सुरू झाल्या आहेत. अद्याप कोरोना संसर्गाचा धोका दूर झाला नाही. तरी अमरावती-औसा या बसमध्ये मंगरूळपीर ते वाशिमदरम्यान सव्वा तासाच्या प्रवासात खच्चून गर्दी दिसून आली.

झाडांच्या हिरवळीने फुलला रस्ता

उंबर्डा बाजार : उन्हाळ्याच्या दिवसांत पानगळतीने भकास झालेला उंबर्डा बाजार ते सोमठाणा हा रस्ता पावसाळा सुरू होताच झाडांच्या हिरवळीने फुलल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Increase in the level of Adana project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.