सिंचन प्रकल्पाच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:37+5:302021-07-25T04:34:37+5:30
-------------- जिल्हा सीमेवर वाहनांची तपासणी वाशिम: उंबर्डा बाजार येथून जवळच असलेल्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेहून होणाऱ्या वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष असून, ...
--------------
जिल्हा सीमेवर वाहनांची तपासणी
वाशिम: उंबर्डा बाजार येथून जवळच असलेल्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेहून होणाऱ्या वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष असून, गुरुवारी याठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिसांनी कसून तपासणी केल्याचे दिसून आले.
----------
वीज पुरवठ्यात व्यत्यय
वाशिम: गत काही दिवसांपासून बांबर्डा परिसरातील गावांत वीज पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. शनिवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले. बँकांमधील कामांवर त्याचा परिणाम झाला.
----------------
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम: गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले असून त्यामुळे परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यातच पीककर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे.
------------
नाल्यांच्या सफाईअभावी आरोग्याला धोका
वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांची सफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याने गुरुवारी सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसले. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आहे.
------------------
आरोग्य केंद्रातील रिक्त पदांची समस्या कायमच
वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत गेल्या कित्येक महिन्यांपासून ९ पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत २ अधिकारी आणि १५ कर्मचारी या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
----------------
धरणावर वाढली झुडपे
वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील कवठळनजीक असलेल्या धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. ही झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.
----------------
पुलावरील कठडे तुटले
वाशिम : कारंजा तालुक्यातील खेर्डा ते काजळेश्वर मार्गावरील उमा नदीवर सुमारे ४० वर्षांपूर्वी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. आता या पुलावरील सिमेंटचे संरक्षक कठडे तुटले आहेत, तर लोखंडी पाईप अज्ञात व्यक्तींनी काढून नेले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची भीती आहे.
----------------
पशू लसीकरणाची प्रतीक्षा
वाशिम: पावसाळ्यात पशू वैद्यकीय दवाखान्याच्यावतीने काही भागात गुरांना लसीकरण करण्यात येते. तथापि, कारंजा तालुक्यातील कामरगाव आणि इतर गावात अद्यापही ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली नाही.