रेल्वेस्थानकावरील सुविधा, अतिरिक्त रेल्वे फेऱ्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:21+5:302021-07-09T04:26:21+5:30

वाशिम रेल्वेस्थानकावर रासायनिक खत व इतर साहित्य साठविण्यासाठी गोदामाची निर्मिती करावी, प्लॅटफॉर्म दोनवर प्रवाशांसाठी व पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ ...

Increase train station facilities, additional train trips | रेल्वेस्थानकावरील सुविधा, अतिरिक्त रेल्वे फेऱ्या वाढवा

रेल्वेस्थानकावरील सुविधा, अतिरिक्त रेल्वे फेऱ्या वाढवा

googlenewsNext

वाशिम रेल्वेस्थानकावर रासायनिक खत व इतर साहित्य साठविण्यासाठी गोदामाची निर्मिती करावी, प्लॅटफॉर्म दोनवर प्रवाशांसाठी व पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये, याकरिता टिनशेडची उभारणी करण्यात यावी, चोरी व इतर गुन्ह्याच्या घटना नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता जीआरपी व आरपीएफचे अधिकारी, कर्मचारी वाढविणे, अकोला ते औरंगाबाद दररोज इंटरसिटी एक्सप्रेस चालू करणे, नांदेडवरून वाशिममार्गे मुंबई ही रेल्वे फेरी दररोज सुरू करण्यात यावी, अमरावती-पुणे-एक्सप्रेस, अमरावती-तिरूपती एक्सप्रेस दररोज सुरू व्हावी, अकोला-अमरावती-मुंबई ही रेल्वे व्हाया वाशिमवरून सुरू करण्यात यावी, दक्षिण मध्य रेल्वेच्या शेगाव येथून धावणाऱ्या रेल्वेंना गजानन महाराज भक्तांकरिता शेगांव येथे एक मिनिटाचा थांबा देण्यात यावा, तसेच कोविडमुळे बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्या, मुंबई-जालना जनशताब्दी या रेल्वेला वाशिमपर्यंत वाढविण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यावेळी शिवसेनेचे रामदास मते, सेंट्रल रेल्वेचे सदस्य तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, ॲड. विनोद खंडेलवाल, गजानन भांदुर्गे, गजानन ठेंगडे उपस्थित होते.

Web Title: Increase train station facilities, additional train trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.