वाहनातील धुरामुळे आजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:37 AM2021-04-05T04:37:06+5:302021-04-05T04:37:06+5:30

डोळ्यावर ही विषारी वायूचा प्रभाव पडत असल्याने डोळ्याचे आरोग्य बिघडविण्यास विषारी वायू घातक असल्याचे बोलल्या जाते. आधुनिक जीवनशैली, औद्योगिकीकरण ...

Increased illness due to vehicle exhaust | वाहनातील धुरामुळे आजारात वाढ

वाहनातील धुरामुळे आजारात वाढ

Next

डोळ्यावर ही विषारी वायूचा प्रभाव पडत असल्याने डोळ्याचे आरोग्य बिघडविण्यास विषारी वायू घातक असल्याचे बोलल्या जाते. आधुनिक जीवनशैली, औद्योगिकीकरण आदी घटकांमुळे डोळे प्रभावित होत आहेत. मानव जीवनात डोळ्याला अनन्यसाधारण महत्व असून तो महत्वाचा घटक आहे. डोळ्यांच्या आजारामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांनादेखील शासकीय यंत्रणा यावर उपचाराबाबत दखल घेत नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. आठवड्यातून एक दिवस नेत्र तपासणी केल्या जात असल्यामुळे त्या दिवशी ग्रामीण भागातील नागरिक ग्रामीण रुग्णालयात पोहचत नाही. त्यामुळे डोळ्यांच्या आजारात वाढ होऊन खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतो. मात्र सामान्य नागरिकांना न परवडणारी ही बाब असून खिशाला कात्री लागत आहे. वायुप्रदूषण, रस्ता कामातील धूर, अनेक विषारी वायू डोळ्यांच्या दृष्टीपटलास इजा पोहोचविण्यास कारणीभूत ठरत आहे.

00000000000000000

वाशिम शहरात कूपनलिकांची पाणी पातळी खालावली

वाशिम : शहरातील अनेक भागातील खाजगी कूपनलिका आटल्या आतहे, तर काही शेवटची घटका मोजत आहे. कूपनलिकेची संख्या लक्षात पाणी टंचाईचा प्रश्न येत्या काही दिवसात पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन पाण्याची बचत करावी असे आवाहन सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.

मालेगाव शहर हे पाणी टंचाईग्रस्त आहे. शहरात अनेक वर्षापासून नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी नाही तर दरवर्षी उन्हाळ्यात शहरात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवते तर टँकरव्दारा पाणी पुरवठा करावा लागतो. मालेगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संख्येने खाजगी बोअरचा वापर केल्या जातो. त्यात गोरगरीब व मागासलेल्या भागात सोडून जवळपास घराघरात खाजगी बोअर घातलेले आहे. या खाजगी बोअरचा मोठा आधार लोकांना आहे, परंतु त्यातील अनेकांचेच्या खासगी कूपनलिकाही उन्हाळ्यात पाण्याअभावी बंद पडतात, यावर्षी मात्र तशी परिस्थिती येणार नाही असे वाटत होते, कारण मागील वर्षी पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला.

परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळा सुरु होताच पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे व त्याचाच परिणाम म्हणून शहरातील अनेक भागातील रहिवासांचे खाजगी कूपनलिकांचे पाणी झपाट्याने कमी झाले व त्यामुळे अनेकांचे बोअर बंद पडले तर अनेकांच्या कूपनलिका शेवटची घटका मोजत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता विहिरीचे अधिग्रहण करणे व टँकरव्दारा पाणी पुरवठा करण्याची योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी होत असून यासाठी नगर परिषद प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे वेळीच पाठपुरावा करावा जेणेकरुन मालेगाव शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात भटकंतीची वेळ येणार नाही.

Web Title: Increased illness due to vehicle exhaust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.