आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Published: June 10, 2017 02:09 AM2017-06-10T02:09:53+5:302017-06-10T02:09:53+5:30
बबन पायघन (वय ५0) यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच तथा कंत्राटदार बबन पायघन (वय ५0) यांच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत ९ जून रोजी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
पायघन हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असलेला पोलीस शिपाई प्रवीण केशव पायघन व वाहन चालक ओमप्रकाश दीपक रोहणकर (रा. नागपूर) यांच्यासह तांदळी बु. येथील दीपक लक्ष्मण कांबळे या तीन आरोपींना पोलिसांनी ६ जून रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. ती आज संपल्यामुळे आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता, तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.