भंगार वाहनांमुळे प्रदूषणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:48+5:302021-01-08T06:12:48+5:30
वीजदेयके मिळतात विलंबाने; ग्राहक त्रस्त तोंडगाव : वीज वितरण कंपनीकडून देयके उशिरा मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दोष नसताना विलंब ...
वीजदेयके मिळतात विलंबाने; ग्राहक त्रस्त
तोंडगाव : वीज वितरण कंपनीकडून देयके उशिरा मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दोष नसताना विलंब शुल्क भरावे लागते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी सिद्धार्थ आघाव यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
....................
पोलीस निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था
शिरपूर जैन : शासनाने पोलिसांना नवीन घरे बांधून देण्याची घोषणा केली असली तरी शिरपूरजैन येथील पोलीस निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाली असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. गावात भाड्याने घरदेखील मिळत नसल्याने काही कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव मोडकळीस आलेल्या वसाहतींमध्ये वास्तव्य करावे लागत आहे.
..........................
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई
वाशिम : येत्या १५ जानेवारीला जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे, असे प्रशासनाने गुरुवारी कळविले.
.....................
मानोरा तालुक्यात पेट्रोलची अवैध विक्री
मानोरा : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या काही गावांमध्ये पेट्रोलची अवैध विक्री सर्रास सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेले गॅरेज, पानटपऱ्या, किराणा दुकानांमध्ये पेट्रोल विक्री केली असून, धोकादायक ठरू पाहणाऱ्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.
........................
धुक्यामुळे हळद पीक संकटात
शिरपूर जैन : गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या सुमारास परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. यामुळे शेकडो हेक्टरवरील हळद पीक संकटात सापडले असून, उत्पन्नात घट होणार असल्याचे संकेत हळद उत्पादक शेतकरी प्रदीप भागवत सोळंके यांनी वर्तविले आहेत.
..................
नाल्यावरील रपटे फुटले; नागरिक त्रस्त
शिरपूर जैन : गावातील काही ठिकाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर रपटे उभारण्यात आले होते; मात्र काम दर्जाहीन झाल्याने बहुतांश रपटे तुटले आहेत. यामुळे नाल्यांमधून दुर्गंधी सुटून नागरिक त्रस्त झाले आहेत.