लसीकरणाला प्रतिसाद वाढला; कोरोना पार्श्वभूमीवर नोंदणी थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:42 AM2021-02-24T04:42:59+5:302021-02-24T04:42:59+5:30

जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांसाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हेसीन मिळून २२ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. त्यात १०५४१ कर्मचाºयांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ...

Increased response to vaccination; Corona stopped registration in the background | लसीकरणाला प्रतिसाद वाढला; कोरोना पार्श्वभूमीवर नोंदणी थांबविली

लसीकरणाला प्रतिसाद वाढला; कोरोना पार्श्वभूमीवर नोंदणी थांबविली

Next

जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांसाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हेसीन मिळून २२ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. त्यात १०५४१ कर्मचाºयांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यासाठी ५५०० जणांची नोंदणी झाली; परंतु सुरुवातीच्या काळात अपेक्षीत प्रतिसाद न लाभल्याने लसीकरण रखडले होते. सुरुवातीला कोव्हिशिल्ड लसीचा वापर लसीकरणासाठी करण्यात आला. त्यात २० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी झालेल्या कोरोना योद्ध्यांपैकी ७५३९ जणांनी लस टोचून घेतली. आता गेल्या दोन दिवसांपासून कोव्हेक्सीनचे डोज देण्यासही आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनाची खबरदारी घेत आरोग्य विभागाने नोंदणीच थांबवली आहे. जिल्ह्यात वाशिम येथे दोन, तर मंगरुळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असून, गेल्या दोन दिवसांपासून या सातही लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रांग लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

-----------------

आतापर्यंत ७१ टक्के लसीकरण

जिल्ह्यात विविध प्रशासकीय विभागासह खासगी आरोग्य संस्था मिळून १०५४१ अधिकाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यात आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांतील मिळून ७४३९ जणांनी लस घेतली आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या जवळपास ७१ टक्के झाले असून, लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे.

-----------------

लसीकरणानंतर घेतली जातेय दक्षता

कोरोना प्रतीबंधक लस घेतल्यानंतर संबंधिताला ३० मिनिटे लसीकरण केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निरीक्षण कक्षात थांबावे लागते. कर्मचाºयांना लस दिल्यानंतर ही बाब लस टोचणारे कर्मचारी संबंधितांना पटवून देत असल्याने लस घेणारे कर्मचारी लसीकरण केंद्रात ३० मिनिटे थांबत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीची काळजी घेणे शक्य होत आहे.

-----------------

कोट: कोरोना लसीकरणाला आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद लाभत असून, लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत असल्याने कोरोना संसर्गाची खबरदारी म्हणून नोंदणीच थांबविण्यात आली आहे. आधी नोंदणी झालेल्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून लस दिली जात आहे.

-डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

कोविड सेंटर

सेंटर लसीकरण

वाशिम (२) २९४२

कारंजा १४६०

मंगरुळपीर १३१६

रिसोड ७५७

मालेगाव ७२८

मानोरा ३३६

------------------------

Web Title: Increased response to vaccination; Corona stopped registration in the background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.