प्रयोगशाळेवरील ताण वाढला; अहवाल मिळण्यास विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:58+5:302021-04-21T04:40:58+5:30
वाशिम : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवसाचा विलंब ...
वाशिम : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अहवाल मिळण्यास तीन ते चार दिवसाचा विलंब होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना मोबाईलवर संदेश पाठविण्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसगार्चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गतवर्षी ३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मेडशी ता. मालेगाव आढळला होता. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. गतवर्षी मार्च ते आॅक्टोबर या दरम्यान जिल्हयात आरटी- पीसीआर प्रयोगशाळा नसल्याने संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे पाठविण्यात येत होते. त्यानंतर जिल्ह्यातच आरटी-पीसीआर प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध झाल्याने स्वॅब नमुने तपासणी आणि अहवाल मिळण्यातील दिरंगाई दूर झाली. कोरोनाच्या दुसºया लाटेत जनजीवन विस्कळीत होत असून, राज्यातच सर्वत्रच कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातही दैनंदिन सरासरी ३५० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, दैनंदिन दीड हजारावर चाचण्या होत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत आहे. त्यातच रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या तालुक्यातील संदिग्धांचे स्वॅब नमुने घेतल्यानंतर दुसºया दिवशी वाशिम येथील प्रयोगशाळेला प्राप्त होतात. दोन, तीन दिवसानंतर अहवाल तयार झाला की पुन्हा दुसºया दिवशी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी पाठविला जातो. यामध्ये तीन, चार दिवसांचा कालावधी जात असल्याने आणि या कालावधीत स्वॅब दिलेला संदिग्ध रुग्ण गृहविलगिकरणातच राहिल याची कोणतीही शाश्वती नसल्याने त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही दिरंगाई टाळण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने संबंधित रुग्णाला मोबाईलद्वारे संदेश देण्याची यंत्रणा उभारली जात आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सांगितले.
०००००
बॉक्स
अहवालासाठी संदिग्ध रुग्णांची ‘कोविड वारी’
सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच, तातडीने चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार लक्षणे दिसून येताच कोविड केअर सेंटर येथे स्वॅब दिला जातो. साधारणत: दोन किंवा तीन दिवसात अहवाल येईल, असे सांगितले जाते. त्यानुसार अहवाल पाहण्यासाठी संदिग्ध रुग्णांची ‘घर ते कोविड सेंटर’ अशी वारी सुरू होते. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त न झाल्यास दुसºया दिवशी येण्याचा सल्ला संबंधितांकडून संदिग्ध रुग्णाला मिळतो. यादरम्यान संदिग्ध रुग्ण बिनधास्तपणे फिरत असल्याने त्याच्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
००००
स्वॅब दिल्यानंतर गृहविलगिकरणातच राहावे !
सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर संबंधितांकडून स्वॅब नमुना दिला जातो. या स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधितांनी गृहविलगिकरणातच राहणे अपेक्षीत आहे. मात्र, अनेकजण बिनधास्तपणे बाहेर फिरतात; एवढेच नव्हे तर शासकीय, निमशासकीय सेवेतील काही कर्मचारीदेखील स्वॅब दिल्यानंतर कार्यालयात जातात. त्यामुळेदेखील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. स्वॅब दिल्यानंतर अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित इतरांच्या संपर्कात न येणे किंवा गृहविलगिकरणातच राहणे अपेक्षीत आहे.
००००००
कोट बॉक्स
सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास प्रत्येकाने कोरोना चाचणी करावी. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यास संबंधितांच्या मोबाईलवर संपर्क साधून तसे कळविण्यात येत आहे. स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची कार्यवाही पूर्णत्वाकडे आली आहे. स्वॅब दिल्यानंतर इतरांच्या संपर्कात न येता प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
- शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी,वाशिम
००००
कोट बॉक्स
कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर दुसºया, तिसºया दिवशी अहवाल दिला जातो. कोविड केअर सेंटरमधील संबंधित कर्मचाºयांनी स्वॅब घेतलेल्यांना अहवाल तातडीने द्यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. स्वॅब दिलेल्यांनी गृहविलगिकरणा राहून आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम.