कोरोना काळात मानसिक ताणामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:12+5:302021-06-19T04:27:12+5:30
कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर ...
कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर कोरोनाच्या आजारामुळे अनेकांना लाखो रुपये खर्च करावे लागले. आर्थिक संकट ओढवल्याने कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण बनल्याने अनेकांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळू लागला. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पोलिसांकडील माहितीनुसार वाशिम शहरात २०२० या वर्षात एकूण ३२, तर २०२१ मध्ये १८ जूनपर्यंत १५ आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यात काहींनी नैराश्य येऊन मानसिक व आर्थिक ताण वाढल्याने आत्महत्या केली.
-----
बॉक्स : कोणत्या वयोगटाचे किती
१) २५ वर्षांपेक्षा कमी - ०८
२) २६ ते ४० - १५
३) ४१ - ६० - १९
४) ६१ वर्षांपेक्षा अधिक - ०५
--बॉक्स:
हे दिवसही जातील
१) कोरोनामुळे व्यवसायावर आलेली अवकळा दूर सारून नव्याने सुरुवात केल्यास स्थिती बदलेल.
२) लॉकडाऊनमुळे आलेले संकट कायम राहणार नसून, त्यातून सावरण्याचा प्रयत्न केल्यास काहीही कठीण नाही.
३) अनेकांना कोरोना काळात संकटांचा सामना करावा लागला. यातील बहुतांश मंडळी आता सावरू लागली आहेत.
-------
बॉक्स:
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज
कोरोना काळात आजार व विविध कारणांमुळे नैराश्य व मानसिक ताण आल्याने व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. हे टाळण्यासाठी कुटुंबाने संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणे, त्याच्या मनातील नैराश्य दूर करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीला आपण एकटे नाही, आपणास मदत करणारे, समजून घेणारे आहेत, असे पटवून देणे आवश्यक आहे.
----
बॉक्स : मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
१) कोट :
कोरोना संसर्गाच्या काळात आजार, ठप्प झालेला व्यवसाय, गमावलेला रोजगार आदी कारणांमुळे अनेकांना नैराश्य येऊन, मानसिक ताण वाढल्याने मनात आत्महत्येचा विचारही येत आहे; परंतु याच कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण फारसे वाढले, असे म्हणता येणार नाही.
- डॉ. प्रज्ञा इंगळे,
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम
-------------------
२) कोट :
कोरोना काळात विविध कारणांमुळे अनेकांची मानसिक स्थिती बदलली आहे. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेले आहेत, अनेकांना एंक्झायटीही आलेली असून, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचारही येत आहेत; परंतु आत्महत्या याच कारणांमुळे वाढल्या, असे म्हणता येणार नाही.
- डॉ. नरेश इंगळे,
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम