वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:38 PM2018-12-28T14:38:27+5:302018-12-28T14:38:47+5:30

वाशिम: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा तयार झाला. परिणामी, रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे.

Increasing area of Rabbi in Washim district | वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ

वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ

Next


 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मुबलक जलसाठा तयार झाला. परिणामी, रब्बीच्या पेरणीत वाढ झाली आहे. सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीताना सद्यस्थितीत ९४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जिल्ह्यात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पेरणीचा समावेश आहे.
मागील तीन वर्षांत यंदा प्रथमच जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला, तर विहिरी, कूपनलिकांची पातळीही वाढली. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाची सोय झाली. या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने सुमारे ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन केले. त्यात हरभºयाचे सरासरी क्षेत्र ६२३९२ हेक्टर, तर गव्हाचे क्षेत्र २८ हजार हेक्टर होते. यामध्ये हरभरा पिकाची पेरणी ही नियोजित क्षेत्रापेक्षा ७ हजार हेक्टर क्षेत्राने वाढली. सद्यस्थितीत गहू पिकाची पेरणी सुरू असून, जिल्ह्यात २४ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गळीत धान्याबाबत शेतकरी यंदाही उदासीन असून, यंदा ५१४ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी कृषी विभागाकडून नियोजित करण्यात आली होती. त्यात करडईचे क्षेत्र ३६८ हेक्टर अपेक्षीत असताना केवळ २९.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, सुर्यफुलाचे क्षेत्र २२ हेक्टर नियोजित असताना केवळ ५.२ हेक्टर, तर इतर गळीत पिकांचे नियोजित क्षेत्र १२४ हेक्टर असताना अवघ्या २.५ हेक्टर  इतर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. अर्थात जिल्ह्यात यंदा प्रत्यक्ष ३७.१ हेक्टर क्षेत्रावरच गळीताची पेरणी झाली. हे प्रमाण नियोजित क्षेत्राच्या तुलनेत १ टक्काही नाही. 
 
रब्बी ज्वारीच्या पेऱ्यात घट
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने १३९७ हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने रब्बी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन केले होते; परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. यंदा गत आठवड्यापर्यंत केवळ ३६२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. वन्यप्राण्यांची भिती आणि पिकासाठी लागणाºया खर्चाच्या तुलनेत बाजारात दर मिळत नसल्याने शेतकरी या पिकाबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

Web Title: Increasing area of Rabbi in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.